चर्चा
मैत्री तीची न याची, चर्चा जगात झाली
चर्चेस त्या भिऊनी, तीही अबोल झाली
सारे प्रयत्न याचे, संवाद साधण्याचे
भिऊन या जगासी, ते सर्व व्यर्थ गेले
बागे मधील बाक, तो पार पिंपळाचा
तो चंद्र या नभीचा, उपयोग काय त्याचा
आशा धरी मनाशी, येउन रोज बैसे
हासे रडे स्वतःशी, वेडा स्वतःशी बोले
दाऊन बोट तीजला, चाले जगात चर्चा
नादाऊनी तयाला, केला बघा हो वेडा
.....निरंजन १५ जुलै १०
आई
संस्कार पूर्वजांचे, ती रुजवून गेली !
पुंजीच सदगुणांची, ती साठवून गेली !
होते तिच्याकडे जे, देऊन सर्व गेली !
प्राण्यांत देव मजला, ती दाखवून गेली !
हृदयात मूलमंत्रा, ती जागवून गेली !
ती आई मजला, माणूस करुन गेली !!
.....निरंजन
!!! नको तो मोर, नको नको पाउस !!!
मेघ फ़ाटुनी पाउस पडतो
बाप डोंगर हतबल होतो
दरडी सुटुनी येती खालती
किती झोपड्या तुटुनी जाती
किती चुली मग विझुनी जाती
माय लेकरे भिजुनी जाती
थरथरणार्या या जिवांना
द्या वस्त्र एक सुके.
धो धो धो धो पाणी येते
रस्त्यावरुनी धावू लागते
मुले अडकती शाळेमध्ये
अन् माय बाप गाड्यांमधे
घरात पाणी घुसते जेव्हा
थर थर होते मनात तेव्हा
हाती लागते ते ते सगळे
घेउन पळती वरती सारे
गुरे किती मग वाहुन जाती
घाय मोकलुन मंगी रडते
मंगीची या तान्ही सोनी
घराबरोबर वाहुन गेली
कुठेतरी मग उंच ठिकाणी
स्वैटर घालून मफ़लर बांधून
रम अन् सोडा समोर घेउन
टिव्ही बघतो त्यांचा नेता
मेघ गर्जती मोर नाचती
कवी हे वेडे कविता करती
चातक वेडा बघतो वरती
नको तो मोर नको नको पाउस
... निरंजन
विद्रोही कवी
एकदा एका कार्यक्रमाला गेलो
गंमत म्हणुन कवीता ऎकायला लागलो
एका विद्राही कवीच्या कवीता मनी रुतल्या
डोळ्यांच्या कडा परत परत ओल्या झाल्या
किती त्याची पुस्तक विकत आणली
बघता बघता अनेक वेळा वाचुन झाली
प्रत्येक कवीता वाचताना डोळे भरुन आले.
गरिबांच दुःख वाचताच गलबलुन आले.
अशीच कधीतरी गाठ भेट झाली
फ़ावल्यावेळी चांगली चर्चाही झाली
कधी तो माझ्या घरी कधी मी त्याच्या घरी
बघता बघता आमची मैत्रीही झाली
एकदा अचानक त्याच्या घरी गेलो
आतल दृष्य पाहुन मात्र सर्दच झालो
हास्य विनोदात रंगलेली
दारु चिकनची पार्टि होती
मित्राला म्हणालो लेका विद्रोही कवी
तुला हासायला परवानगी कोणी दिली
हासत हासत म्हणतो कवी
विद्रोही कवीतांची आहे मोठी चलती
त्यानी माझी ओळख करुन दिली
हे आपले प्रकाशक व हे आपले मंत्री
यंदा गावोगावी काव्यगायन करीन
यंदाच इलेक्शन गाजऊन टाकीन
त्यांचीच गरिबी त्यांनाच ऎकवीन
इलेक्शन जिंकवुन शिरमंत होईन
रंग रंगोटी करुन घर झाक झुक करीन
गडी माणसाकडुन आंगण सारवुन घेईन
शेजारचा उपाशी नाम्या सकाळी रडतो
दिवाळीची मजा भडवा खराब करतो
यंदाची दिवाळी गोव्यात करीन
दारु पिता पिता कवीता करीन
तडक उठुन मी घरी आलो
पुस्तकांच्या ढीगावर रॉकेल ओतु लागलो
आग पेटताच वेड्यासारखा हासलो
राखेकडे बघुन मात्र हमसाहुमशी रडलो.
---- निरंजन
कधी कधी मी सुद्धा......
कधी कधी मी सुद्धा, दान धर्म करतो!!
शिळपाक आंबल चिंबल, भिकार्यांना देतो
जुने कपडे घेणारे, फ़ार मुजोर झालेत
फ़ाटके तुटके कपडे विकत घेईनासे झालेत
मग असे कपडे मी भिकार्यांना देतो
आंगण त्यांच्या कडुन झाडुन झुडुन घेतो
कधी कधी मी सुद्धा, दान धर्म करतो!!
कधी कधी मी सुद्धा सोशल वर्क करतो!!
आदिवासी पाड्यावर कारनी जातो
तांदूळ आणि मध मी येताना आणतो
मोलकरणीच्या मुलीला कामाला ठेवतो
मरेस्तोवर तिच्याकडुन काम करुन घेतो
कप फ़ुटला डिश फ़ुटली पगारातुन कापतो
थॅंक्यू व गुडमॉरनिंग म्हणायला शिकवतो
कधी कधी मी सुद्धा सोशल वर्क करतो!!
कधी कधी मी सुद्धा देशभक्त होतो ॥
गांधी जयंतीला पांढरे कपडे घालतो
गांधींच्या फ़ोटोला हार घालतो
गांधीजी की जय, भारत की जय
अस ओरडुन घोषणा देतो
स्वातंत्राच्या लढ्यावर भाषण ठोकतो
नेत्याबरोबर माझा फ़ोटो छापून आणतो
कधी कधी मी सुद्धा देशभक्त होतो ॥
...... बार.........
कधीच दारुला स्पर्ष न करता स्वामीजींनी "BAR"
या नावानी काही अप्रतिम इंग्रजी कवीता केल्या.
त्या वाचुन
दारु पिता पिता ओनलाईन होतो
स्वामीजींची "बार" कवीता वाचत होतो
तडक उठलो, भरला ग्लास देवा पुढे ठेवला
तोंडात फ़ाड फ़ाड मारुन घेतल्या
दारुला हात न लावलेल्या स्वामीजींना
दारुवर कवीता करता आल्या
देवापुढे निश्चय केला
एक तरी कवीता करीन तेव्हाच दारुला हात लावीन.
देव हासत म्हणाला अरे झाली की कवीता
देवानीच ग्लास माझ्या तोंडाला लावला
देवाचीच आज्ञा, ग्लास रिकामा केला
देवानी लगेच ग्लास दारुनी भरला
असे किती ग्लास रिकामे केले
देवानी तेव्हढेच भरुन दिले
देवाचा हासरा चेहरा मनात ठेवला
कधीतरी माझा लाळागोळा जमीनीवर पडला
सकाळी कधी तरी जाग आली
लगेच देवाची आठवण आली
समोरच देव उभा होता
हासत हासत बघत होता
काहीतरी बोलत होता,
हातातला कागद दाखवत होता
डोळे ताणुन बघीतल
कसला देव, हा तर बारवाला होता
मोठ्या बिलाची मागणी करत होता.
....... निरंजन
गेस्ट हाउसवर एका रात्री
चालली होती रेव पार्टी
रॉक म्युझिक दणाणतय
धुंद सारे नाचतायत
मनी मनी नो प्रोब्लेम
ड्र्ग दारु नो प्रोब्लेम
डान्स डान्स रिव्हॉल्युशन
हॉटेस्ट पार्टी ओफ़ द सिजन
नाचणार्या बार बाला
लाखांच्या मालकिण झाल्या
त्यात नाचते एक बाला
गोरी गोरी, कमनिय बांधा
गोड गळा, गोड चेहरा
हसता पडे खळी गाला
डान्स डान्स रिव्हॉल्युशन
हॉटेस्ट पार्टी ओफ़ द सिजन
पार्टीचा होस्ट तीचा
हात धरुन नाचु लागला
अचानक लाईट गेले
का मुद्दाम घालवले?
अंधाराचा फ़ायदा घेती
बेहोष सारे नाचती
डान्स डान्स रिव्हॉल्युशन
हॉटेस्ट पार्टी ओफ़ द सिजन
तोच एक करुण किंकाळी
आसमंतात घुमली
नीळा लाईट अचानक आला
कमनिय बालेच्या तोंडावर पडला
तीच्या तोंडुन रक्त गळत
होस्टच कलेवर हातात असत
डान्स डान्स रिव्हॉल्युशन
हॉटेस्ट पार्टी ओफ़ द सिजन
दारे खिड्क्या बंद होती
काळा अंधार गडद होई
एक थंड लहर येई
सर्वांच्या मनाचा वेध घेई
दारुची धुंदी क्षणात उतरे
अचानक सगळे शांत होते
डेथ डेथ रिव्हॉल्युश
लास्ट पार्टी ओफ़ द सिजन
...निरंजन
तो एक प्याला खरा.
प्रेमाला मीळो दाद,
वा थप्पड गाली पडो
धंद्याला मिळो नफ़ा
अथवा तोटा असो
दुःखाला विसरा, सुखात हरवा,
विसरा स्वतःला जरा
आनंदे जग ज्यात रमते
तो आनंद खरा
रंकाला क्षणात बनवी
राजा जगाचा कसा
वृद्धाला तरुण करुनी
सोडी पहा तो कसा
प्रेमाला आसरा मिळे कुठे
अन् दुःखा मिळे दिलासा
या सर्वावर इलाज करतो
तो एक प्याला खरा.
...निरंजन ....२ जुलै १०
माझा लाडका मास्तर
एकदा मला मास्तर बोलला
आयुष्यात कोण व्हायचय तुला ?
बोललो कॊणी पण होईन
मास्तर होऊन मुलांना तरास पण देईन !!
हात का हातोडा
गालावर बसला
डोळ्यांच्या कडा माझ्या
ओल्या झाल्या
एकदा आमचा मस्तर
शाळेत नारंगी घेउन आला
मला एक पेग देउन साला
पुरी बाटलीच प्याला
एकदा आमचा मास्तर
लय पीला होता
भुगोलाच्या तासाला
गणिताच्या बाईला बोलवत होता
..... निरंजन
आमावास्येच्या रात्रीला
लाईट आले
लाईट गेले
आता मात्र
पुरेच गेले
भयाण काळी
भयाण वेळी
भयाण जागी
ही आरोळी
काय झाल ?
काय़ झाल ?
भुत आल
भुत आल.
दोन पाय
दोन हात
तीन डोकी
डोळॆ चार
उलटे पाय
उलटे हात
सुळे बाहेर
डॊळॆ आत
कधी पुढे
कधी मागे
कधी उलट
कधी सुलट
हाता मधे
माझी मान
माने मधे
सुळॆ चार
हासता हासता पुरेवाट
मला आले सुळे चार
कवीता ही वाचताच पहा
तुमच्या घरी येईन आज
..... निरंजन
इद्रावती वाहे शांत
तीथे जळे माझे प्रेत
पांडुरंग माझा सखा
बोलावीतो पैलतीरा
मुले लेकरे घर दार
तेथे माझा गुंते जीव
पांडुरंगा विन्मुख केला
आलो माझ्या घरट्याला
सगे सोयरे डोळॆ पुसती
बरे झाले सुटलो म्हणती
गुण दोष आठवती
विसरुन मज जाती
पुन्हा आलो स्मशानात
झालो मनात अस्वस्थ
सगे सोयरे माय बाप
नव्हते माझे हो कोणीच
गुरु पाय आठवले
मन विरक्त हो झाले
वाट दावी गुरु राव
नेले मज पैल तीर
....निरंजन
No comments:
Post a Comment