Monday, June 27, 2016

पाऊस !

जोराचा पाऊस कोसळत होता. साथीला वारा होताच. मी खिडक्या लावायला सुरवात केली. शेवटची खिडकी लावताना, माझ रस्त्यावर लक्ष गेल. एक १०-१२ वर्षाची लहान मुलगी नुकतीच शाळेतुन आलेली असावी. पावसात मस्त भिजत होती. आकाशाकडे तीनी हात वर केलेल होते. आकाशाला आपल्या चिमुकल्या हातात तीनी कवटाळल होत व तोंड उघडुन ती पावसाच पाणी पित होती. या मुलीला जवळुन बघाव म्हणुन मी पटकन खाली आलो.

तीचे केस पुर्ण ओले झाले होते. दोन बटा कपाळावरुन गालावर चिकटलेल्या होत्या. चेहऱ्यावरुन पाणी खाली तीच्या हनवटीवरुन ओघळत होत. पाठीवरच दप्तर चिंब भिजल होत. शाळेचा गणवेश पुर्ण भिजला होता. पण या कशाचीच तीला शुद्ध नव्हती. ती आनंदानी या पावसाच स्वागत करत होती. तीच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनिय होता. चेहऱ्यावरची प्रत्येक रेष हासत होती. ओठाच्या कडेतुन फटणारं हे समाधानाच हास्य मोठ गोड दिसत होतं.

स्वतःच्याच आनंदात मश्गुल झालेली ती मुलगी आजुबाजुच जगच विसरली होती. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, कित्येक लोक येतायत जातायत. तीला कशाचच भान नव्हत. रस्त्यानी जोरात वाहात जाणाऱ्या पाण्यात तीची पावल पुर्ण बुडाली होती. जस जसा पाऊस वाढत होता, तस तसा तीच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढत होता. वरुण देव पण आपल्या या चिमुकल्या भक्ताच्या निरागस भक्तीनी सुखावला होता व पावसाचे टपोरे थेंब आकाशातुन पाठवुन तीला जास्त जास्त आनंदीत करत होता.

----------------------

मला माझ लहानपण आठवल. माझ घर घरासमोरच आंगण. माझ्याजवळ बसेला माझा आवडता कुत्रा. बाहेर पाऊस पडत होता. तुफान वारा होता. अंगणातल गवत वाऱ्याबरोबर डोलत होतं. पाऊस कोसळत होता. मी माझ्या नकळत आंगणात गेलो. माझा कुत्रा भुकुन मला घरात बोलवत होता. मी आकाशाकडे पाहिल व डोळे बंद करुन, हात वर करुन ते पाणी प्यायला लागलो. मी रोज ज्या झाडांबरोबर खेळत होतो त्यांना खुप आनंद झाला व ती जोरजोरात डोलायला लागली. पाण्याचा सपकारा माझ्या तोंडावर बसत होता. मला जास्तच आनंद होत होता. घोंघावणारा वारा माझ्या कानांमधे गोड गाणं गात होता

मी आसमंताशी पुर्ण एकरुप झालो होतो. बाजुच्या जांभळीच्या झाडानी पानावरुन ओघळणारे थेंब माझ्या अंगावर शिंपडले. मी त्याच्याकडे पाहिल त्यानी डोलता डोलता मला विचारल "मजा येते न ! उन्हाळ्यात किती शरीर तापल होत. आता कस शांत वाटतय" मी मानेनीच त्याला होकार दिला. बाकी झाडांनी डोलुन मला साथ दिली. माझ्या चिमुकल्या पायाखाली दबलेल्या गवतानी माझ्या पायाला गुदगुल्या केल्या. त्यालाही खुप आनंद झालेला होता. किती वेळ या समाधी अवस्थेत होतो माहिती नाही.
---------------------
मी भराभर मनानी लहान झालो. सगळ आजुबाजुच जग विसरलो. हात वर केले, डोळे बंद केले व त्या पावसाच मनापासुन स्वागत करायला लागलो. निसर्गाची जादू सुरु झाली. मी परत समाधीत गेलो. ते पावसाचे थेंब माझ्या गालावरुन ओघळत होते. माझ्या आईच्या हाताचा स्पर्ष होता त्यात. तो घोंघावणारा वारा मला सुखावत होता. रस्त्यानी खळाळत जाणारे ओघळ माझ्या पायाला गुदगुल्या करत होते.

तोच कोणी तरी म्हणल "काकांना वेड लागल आहे. आजारी पडतील तेव्हा समजेल" मी समाधी अवस्थेतुन झटकन वास्तवात आलो. मी म्हातारा आहे. असला थिल्लरपणा करायला नको. धावत वर घरात गेलो. दार लावल. टॉवेल घेऊन डोक पुसल. परत खिडकीत आलो. समोर ती मुलगी होती. आता ती व तीच्या मैत्रिणी घरी जात होत्या. एका ठिकाणी थोड पाणी तुंबलेल होत. तीनी त्या पाण्यात बदकन उडी मारली. पाणी मैत्रिणींवर उडाल. त्या किंचाळल्या व त्यांची फजिती बघुन ती मुलगी खदखदुन हासली.

मी खिडकी बंद केली. ओले कपडे बदलले व स्वैटर चढवला. आता मी मनानीही म्हातारा झालो. मन म्हातार झाल्यावर शरीर दुप्पट वेगानी म्हातारं झाल व मला दोन तीन शिंका आल्याच.





Sunday, June 26, 2016

अदृष्य


वासंती भराभर काम उरकत होती. लहान अनुप झोपला होता तोवर काही कामं उरकण आवश्यक होत. आज अमोलबरोबर शॉपिंगला जायच होत. पुढच्या महिन्यात चार पाच नात्यातली लग्न होती. हा टॉमी पण सारखा पाया पायात येत होता. वासंतीनी टॉमीला जवळ घेतल त्याची पापी घेतली.

टॉमी बाळा, आय लव्ह यु ! सारखा पाया पायात येऊ नकोस"

टॉमीवर ती मुलासारख प्रेम करत होती. तीनी अनुप झोपलेला होता त्याच्या कॉटच्या जळच टॉमीला बांधुन ठेवल व म्हणाली

"टॉमी, अनुपकडे लक्ष ठेव बर का ! तुझा लहान भाऊ आहे न तो. त्याची दुधाची वेळ झाली की तो उठेल. तो पर्यंत भुकुन भुकुन त्याला उठवु नकोस"

टॉमीला लगेच समजल. खुप समजुतदार कुत्रा होता तो. त्यानी आपली गळयातली साखळी पायानी नीट केली व थोडा वेळ मान पायानी खाजवुन तो मागच्या पायावर बसुन व जिभ बाहेर काढुन आपल्या लहान भावाकडे बघत बसला. अनुप जागा झाला की त्याच्याशी खेळणार होता तो.

वासंतीनी काम उरकल. कपडे बदलले. गरम केलेल दूध तोवर थोड थंड झालेल होत. तीनी ते बाटलीत भरल व बेडरुममधे आली. त्या मोठ्या बेडरुमच्या एका बाजुला बेड होता. तीला अनुप दिसला. तो नुकताच जागा झाला व उपडा झाला. नुकताच अनुप उपडा होऊन सरपटायला लागलेला होता. वासंती म्हणाली

अनु, थांब पडशील" ती झटपट बेडजवळ येत होती. तेव्हढ्यात आईकडे बघत अनुप सरपटत पुढे आला व बेडवुन पडला
वासंती
अग बाई" अस किंचाळुन पुढे झाली पण काही वेगळाच प्रकार झाला होता. पडणारा अनुप अदृष्यझाला होता.
अनु ....”

अस मोठ्यानी किंचाळुन वासंती त्याला शोधायला लागली. पण अदृष्य झालेला अनुप तीला दिसत नव्हता. त्याचा आवाज मात्र एेकायला येत होता. वासंती रडायला लागली. तीच रडण एेकुन शेजारीण धावली. एकुण प्रकार पाहिल्यावर त्या शेजारणीनी सगळी सुत्र आपल्या हातात घेतली. वासंतीच्या नवऱ्याला अमोलला फोन करुन ताबडतोब घरी बोलावल. जवळच्या पोलिस स्टेशनला फोन करुन त्यांना वर्दी दिली आणि अनुपला शोधायचा आपल्या परीनी प्रयत्न सुरु केला.
वासंती घायमोकलुन रडत होती. टॉमी सारखा भुकत होता. साखळीला हिसके देत होता.

एक तगडा पोलिस इंस्पेक्टर, एक हाडकुळा पण तरतरीत हवालदार थोड्याच वेळात पोचले. त्यांच्या पाठोपाठ धावत धावत अमोल येऊन पोचला. अमोलला पाहिल्यावर वासंतीनी त्याला मिठी मारली व रडतरडत काय झाल ते सांगितल. इंस्पेक्टरनी कॉंस्टेबलला खुण केली व त्यानी सर्व घरभर फेरी मारुन काही अनुचित दिसत नाही हे पाहिल. आता अनुपच्या भुकेची वेळ झालेली होती. तो मोठ्यानी रडायला लागला. सर्वांना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज तर एेकायला येत होता पण अनुप दिसत नव्हता. अनुपच रडण एेकुन वासंती व अमोल दोघेही रडायला लागले. शेजारीणीलाही अनुपचा खुप लळा होता. ती पण रडत होती. पोलिसांना काहीच समजत नव्हत करायच काय. पंचनामा तरी काय करणार ? काय झाल याची माहिती पण कोणी नीट देत नव्हत. तरी थोड थोड विचारुन पंचनामा तयार केला. नुसत बघत बसण्याशिवाय हातात काहीच नव्हत.

हवालदार वैतागला होता. मुलाच्या रडण्याचा आवाज, बाई घायमोकलुन रडते, तीचा नवरा रडतोय. हे कमी होत म्हणुन हे कुतरडं मोठ्या मोठ्यानी भुकतोय. आज सकाळीच त्याला साहेबांनी कारण नसताना जाम शिव्या दिलेल्या होत्या. आता डबा उघडुन जेवणार तर ही केस आली. जाम वैतागला होता बिचारा. त्यानी विचार केला निदान या कुत्र्याची साखळी सोडु. तो बाहेर जाईल. एक आवाज बंद होईल.

त्यानी कुत्र्याला सोडल व कुत्र्यानी एकदम झेप घेतली.

हवालदारानी जाऊन टॉमीची साखळी सोडली व टॉमीनी धावत जाऊन झेप घेतली. ज्या ठिकाणाहुन अनुप गायब झाला होता तीथुनच टॉमी पण गायब व्हायला लागला. वासंतीनी ते पाहिल. एक मुल तर गायब झालच आहे. आता हे दुसर बाळ गायब होतय. तीनी "टॉमी...” असा टाहो फोडुन झेप घेतली व टॉमीची तंगडी पकडली. टॉमी पुर्ण गायब झाला व वासंती पण कंबरेपर्यंत अदृष्य झाली. अमोलनी “वसु...” अस ओरडुन तीची तंगडी पकडली. वासंती गायब झाली व अमोल पण गायब होत होता. हवालदारानी पटकन अमोलची तंगडी पकडली. अमोल गेला व हवालदार पण गायब व्हायला लागला. इंस्पेक्टर उठला. म्हणाला. “त्यांना मरु दे. तू कशाला जातोस" अस म्हणुन त्यानी हवालदाराची तंगडी पकडली व त्याला जोरात ओढल.

हवालदार बाहेर आला. त्याच्या हातात अमोलची तंगडी. अमोल बाहेर आला. त्याच्या हातात वासंतीची तंगडी. वासंती बाहेर आली. तीच्या हातात टॉमीची तंगडी व टॉमी बाहेर आला त्याच्या तोंडात अनुचा पाय. अनुप बाहेर आला व रडायला लागला.

------------------------------

मित्रांनो ही आहे आईनस्टाईननी मांडलेली रीलेटिव्हीटी (सापेक्षता) ची थिअरी. आपण त्रिमिती जगाचा विचार करतो. प्रत्येक पदार्थाला लांबी, रुंदी व उंची आहे. या झाल्या तीन मिती. पण यालाच जर आपण काळ ही एक मिती जोडली तर होईल चतुर्मीती जग. आपण अशा जगात राहतो. काळाबरोबर आपण पुढे पुढे जात असतो. गेलेला मागचा क्षण आपण पाहु शकत नाही. पण तो गेलेला क्षण तर असतोच न. फक्त आपल्याला तो दिसत नाही इतकच. एकाच वेळी दोन अश्या सृष्टी एकाच ठिकाणी अस्थित्वात असु शकतात. कधी कधी अपघातानी एखाद्या ठिकाणी या दोन सृष्टी एकत्र येतात. आपल्याला दूसऱ्या सृष्टीतल काहीच दिसत नाही. ज्या ठिकाणी या दोन सृष्टी एकत्र येतात अशा ठिकाणी आपल्याला त्या सृष्टीतली माणसं दिसु शकतात. यालाच कदाचित भुत म्हणत असतील. अशा ठिकाणाहुन आपला अनुप दूसऱ्या जगात निघुन गेला होता. कुत्र्याला सहाव इंद्रिय आहे म्हणुन अथवा तो ज्या ठिकाणी बांधलेला होता तिथे दोन्ही सृष्टी दिसत असतील. त्याला त्या सृष्टीत गेलेला व तीथे सरपटत आपल्यापासुन लांब जाणारा अनुप दिसत होता. बाकी कथा तर आपल्याला माहितीच आहे.
मी माझ्याकडुन या कथेच स्पष्टीकरण दिल. ते तुम्हाला कदाचित पटल नसेल. रिलेटिव्हीटी हा खुप मोठा विषय आहे. ती चतुर्मिती जगत इतकच देऊन थांबता येत नाही. तुम्हाला या कथेबाबत काही मत मांडायच असेल. समजलेल्या वा आधीच माहिती असलेल्या रिलेटिव्हिटी थिअरी बाबत काही मत मांडाव व थोडी तरी चर्च्या करावी ही आपेक्षा आहे.


Monday, April 25, 2016

बायल्या !



मी थोडा मुलीसारखा नाजुक दिसतो. आवाज पण मुलीसारखा आहे. त्यामुळे सगळेच मला त्रास देत असतात. बायल्या हे नांव तर मला कधी पडल हेच आठवत नाही. आता तेच माझ टोपण नाव झाल आहे. चालताना माझी कंबर मुलींसारखी हालत असते अस सगळे म्हणतत. मी खुप प्रयत्न केला पण नाही नीट चालता येत. रस्त्यानी जायला लागलो तर लोकं बघतात व एकमेकांकडे बघुन हासतात. घाण जोक करतात. मी लक्षच देत नाही.

एखाद्यामधे काही शारिरीक कमतरता असली तर समाजात तो माणूस एक चेष्टेचा विषयच होतो. लहानपणापासुन मला मित्रांनी, शेजारपाजारच्या लोकांनी, शिक्षकांनी , रस्त्यातुन येता जाता कोणीही त्रास दिलेलाच आहे. सुरवातीला खुप राग यायचा. आता सगळ्याचीच सवय झालेली आहे. मनच कोडग होऊन गेल आहे. होस्टेलला आल्यापासुन तर हा त्रास रोजचच सुरु झाला आहे. आता हेच माझ आयुष्य आहे. मनानीच ते मान्य केलेल आहे.

किती दिवस झाले सतत खुप थकवा वाटतोय. रोज थोडा थोडा ताप येतोय. जागच उठुच नाही अस वाटत. मनात कुठे तरी खुप खुप भिती वाटत राहते. थकव्यामुळे उन्हाचा त्रास होतो व डोळ्यांना प्रकाश नकोसा वाटतो. हल्ली रात्रीचाच बाहेर जातो. खानावळीत जातो पटापट जेवतो, लगेच परत.

खर तर मला रात्री बाहेर जायची खुप खुप भिती वाटते. भितीनी चेहरा पांढरा फटफटीत होतो. घशाला कोरड पडते. सतत तहान लागते. होस्टेलमधली मुलं मला यावरुन खुप हासतात. विश्या तर फारच हासतो. त्याला कसलीच भिती नाही, म्हणुन काय इतरांना हासण्याचा मक्ता मिळाला आहे का ? रात्री केव्हाही बाहेर जातो. सिनेमा, नाटकं इतकच कशाला तमाशासुद्धा बघतो. आणि मग आल्यावर त्यातले आचकट विचकट विनोद मित्रांना रंगवुन रंगवुन सांगतो. शी ! किळस येते अगदी. कसले कसले घाण जोक. कसे या सर्वांना आवडतात काय माहिती ? पण मला विश्या आवडतो. प्रेम आहे माझ त्याच्यावर.

मी कालच त्याला म्हणालो "विश्या उद्या आमावास्या आहे. रात्री उशीरा बाहेर पडु नकोस. होस्टेलच्या मागच्या बाजुला असलेल्या विहरीजवळ गेल्या महिन्यात एक जण मेलेला सापडला आहे.

विश्या खदखदुन हासला. त्याचा चेहरा मग्रुर झाला. कपाळावरची व मानेवरची शिर तट्ट फुगली. मला झटकुन देत म्हणाला

उद्या जाऊन बघतोच तीथे. मला नाही कसली भिती वाटत"

माझ्या अंगावर काटाच आला.

तो पुढे म्हणाला. “मला कसलीच भिती वाटत नाही. उद्या तूच ये बरोबर"

हे वाक्य म्हणताना त्याचा चेहरा गर्वानी फुलुन आला. दोन्ही भुवयांमधली उभी रेषा जास्तच जाड दिसली. मानेच्या शीरा तटतटुन फुगलेल्या असल्या. त्या विश्याच्या एकुण मग्रुर चेहऱ्याला साजेशाच वाटल्या. मॅनली वाटला त्यामुळे.

मला जाम भिती वाटते. मी नाही जाणार असल्या ठिकाणी. आज तर आमावास्या आहे. जरा लवकरच जातो जेवायला. त्या खानावळवाल्या काकु पण मला जरा जास्तच त्रास देतात. रात्री माझी प्लेट नेहेमी उशीरा लावतात. मला यायला उशीर होतो. रात्री नऊ वाजता खानावळ सुरु होईल. चला निघतो आता. नऊ वाजत आले.

मला कोणी मित्र नाहीत. माझ्याबरोबर यायची सर्वांना लाज वाटते. गांगुली तर म्हणतो "शी ! तेरे साथ काैन आयेगा. सब हसेंगे मुझे" मी एकटाच रस्त्याच्या कडेकडेनी जातो. आईनी सांगितल आहे. कडेनीच जा. आई सांगते ते नेहेमीच बरोबर असत. तीनी सांगितल तस, कडे कडेनी व खाली बघत, नाकासमोर चालत, सरळ खानावळीत जातो.

काकु, मी आलो जेवायला वाढता का ?”
अग बाई. मुकुंदा, तू आलीस. बस बस"

हे बघा असा हे सगळे त्रास देतात.

"मुकुंदा, तुझी खुर्ची रिकामी नाही थांब थोडा"

कोपऱ्यातली खुर्ची ही माझी ठरलेली जागा आहे. तीथे कोणी बसलेल असल, तर तो माणूस जाईपर्यंत मी बाजुला ऊभा राहतो. तीच खुर्ची मला लागते. माझ्या खुर्चीत बसलेला जायला थोडा जास्त वेळ लागला. मग मी बसलो.

मी बसलो की थोडाच वेळात बळवंत येतो. हे नेहेमीचच आहे. तो माझ्यासमोरच्या खुर्चीत बसतो. काही तरी अगम्य बोलत राहतो. मी गप्पच बसतो. त्याला माझ्या उत्तराची आपेक्षाच नसते. मी खाली मान घालुन जेवत असतो. बळवंत बोलत राहतो. माझ्याशी आवर्जुन बोलणारा हाच एकमेव मित्र. खानावळीत येतो पण जेवत नाही. आजही तसच झाल. बोलत होता. मला जेवण जात नव्हत. तहान लागलेली होती. पाण्याची बाटली तोंडाला लावली आणि सगळी संपवली. तेव्हढ्यात खानावळीत विश्या शिरला. सरळ आला व माझ्या समोरच्या खुर्चीत बसला. त्याला पाहुन बळवंत हासत हासत निघुन गेला.

विश्या मला हळु आवाजात बोलला
"आज रुमवर रुबीला बोलावल आहे. तू आज बाहेर झोप"
विश्या, माझ्या रुमवर हे नको"

विश्याचा मग्रुर चेहरा जास्तच मग्रुर झाला. डोळे आग ओकत होते.

बायल्या, साल्या, तुला आजुन मी किती वाईट आहे हे माहिती नाही"

तो पटापट जेवला व बाहेर गेला. मी हात धुतले. उठावस वाटतच नव्हत. विश्या रुबीला नक्कीच घेऊन येणार. मला धरुन मारेल, काय वाटेल ते करेल व बाहेर काढेल. कसा बसा खानावळीतुन नाईलाजानी बाहेर पडलो.

उशीर झालेला होता. दाट काळोख. रस्त्यावर तुरळक दिवे लागलेले होते. खुप वळणं अंधारीच होती. या रस्त्यावर रहदारी नसतेच. मी कडेकडेनी चालत होतो. कोपऱ्यावर विश्या उभा होता. मला भितीच वाटली. तसच मागे पळुन जावस वाटत होत. विश्या दोन ढेंगा टाकुन माझ्याजवळ आला.

मला म्हणाला "बऱ्या बोलानी सांग, काय करणार आहेस ?”

मी म्हणालो "विश्या मला खुप भिती वाटते. आज आमावास्या आहे. रात्री भुतं फिरत असतात"

विश्या विचित्र हासला. त्या काळोखात त्याचा चेहरा जास्तच उग्र वाटला. त्यानी माझा हात पकडला व मला ओढल. म्हणाला आता तुला होस्टेलच्या मागे नेतो. दाखव मला कुठे आहे भूत. मी खुप घाबरलो. थरथर कापायला लागलो. विश्यानी खिशातुन चाकू बाहेर काढला. म्हणाला

"चल चुपचाप, नाही तर खुपसुन टाकीन"

मी भितीनी बेशुद्धच पडणार होतो. म्हणालो विश्या चाकू ठेव खिशात. मी येतो तुझ्याबरोबर पण मला प्रॉमिस कर तू मला सोडुन पळुन जाणार नाहीस. मी त्याचा हात घट्ट पकडला. त्यानी चाकु खिशात ठेवला व मला म्हणाला

"किती भितोस. भितीनि हात थंड पडला आहे"

खरच माझा हात थंडच असणार. विश्या कशाला खोटं बोलेल ? विश्याचा हात किती उबदार होता. हवा हवासा उबदारपणा.

विश्या म्हणाला "चल दाखव भुत"

भूत काय मुद्दाम जाऊन बघण्याची गोष्ट आहे का ? मी विश्याचा हात घट्ट पकडला होता. तो जवळ जवळ मला खेचतच नेत होता. होस्टेलच्या मागच्या बाजुला खुपच अंधार. मला खुप भिती वाटत होती. तोच जवळच काही तरी आवाज झाला. कोणी तरी हासल्यासारखा. मी खुप घाबरलो. विश्याला घट्ट मिठी मारली.

घाबरत म्हणालो “विश्या भूत आलं. आता ते आपल्याला खाणार"

विश्या परत तसाच बेफिकीर हासला. मला म्हणाला किती घाबरतोस. मी टॉर्च आणला आहे. बघु कोण आहे. त्यानी टॉर्च टाकला. जवळच्या झाडाखाली कोणी तरी बाई व तीच्या बाजुला एक माणूस उभे आहेत अस वाटल. विश्यानी त्याचा चाकू काढला व धीटपणे विचारल

"कोण आहे ?”

माझ लक्ष विश्याकडे गेल. टॉर्चच्या थोड्या रिफ्लेक्ट झालेल्या प्रकाशात त्याचा चेहरा भयानक दिसत होता. मोठे व बेफिकीर डोळे, कपाळावरची उद्दाम शिर व सर्वात महत्वाची मानेवरी शिर. आज प्रथमच ती शिर मी इतक्या जवळुन बघत होतो. तट् तट् उडत होती. माझ्या नकळत मी त्याच्या जवळ गेलो. तोंड उघडल. चारही सुळे अचानक बाहेर आले व त्याच्या मानेत घुसले.

विश्या मला झटकत होता पण माझी ताकत वाढत होती. त्याची कमी होत होती. विश्या माझ्या हातात लुळा पडला. ती अंधारातली बाई पुढे आली. मी विश्याला तीच्या स्वाधिन केल.

आई, किती दिवसांनी भेटलीस"

तीनी माझ्या डोक्यावरुन हात फिरवला. ती व बळवंत विश्याला घेऊन निघुन गेले. आता मला ताकद आली होती.

भराभर पुरुषासारखा चालत मी होस्टेलला आलो व झोपुन गेलो.

--- निरंजन