खरा गरिब कोण हे ठरवणं मोठ कठिण काम आहे.
पण मला वाट्त ज्याला आपल्या स्वभावातले दोष काढता येत नाहीत तो खरा गरिब.
आपल्या मराठीत "स्वभावाला औषध नसत" हा वाक्प्रचार ज्या कोणा महाभागानी तयार केला त्यानी मराठी भाषिकांच कायमच नुकसान केल. हा वाक्प्रचार आपल विचारचक्र ताबडतोब थांबवुनच टाकतो.
मनाच्या श्लोकांच्या शेवटी एक श्लोक आहे.
"मनाची शते ऎकता दोष जाती।
मती मंद ते साधना युक्त होती ॥"
इथे मनाची शते म्हणजे मनातले दोष, विकार अथवा कमकुवतपणा असा अर्थ अभिप्रेत आहे. मनाचे दोषच स्वभाव दोष तयार करतात व तेच जगापुढे आपल्या छोट्या मोठ्या वागण्यानी आपणच जाहिर करत असतो.
या श्लोकामधे असलेल्या साधना या शब्दाचे निरनिराळॆ अर्थ निघु शकतात, आपण जे कोणत काम करणार असतो त्यासाठी लागणारी तयारी हा सुद्धा एक अर्थ नक्कीच निघु शकतो.
आपल्या आयुष्यात पावलो पावली आपल्याला अनेक संधी येत असतात. आपण कोणीहि झापड बांधुन वावरत नसतो. मग आपल्याला मिळालेल्या संधीच सोन का करता येत नाही?
आड येतो तो आपला स्वभाव. मी अनेक लोकांकडुन ऎकलेल आहे.
"मी आयुष्यात खुप काही केल असत रे, पण माझा स्वभाव आड येतो न ! "
आपला स्वभाव आपल्या प्रगतीच्या आड येतो ही काय अभिमानास्पद गोष्ट आहे का ?
कदाचित दुसर्याच्या स्वभावाला औषध नसेल सुद्धा पण स्वतःच्या स्वभावाला तर नक्कीच असत.
आपण दुसर्याला सहज म्हणातो " जरा स्वतःच्या स्वभावाच आत्मपरिक्षण कर." हे म्हणताना आपण स्वतः मात्र सर्वज्ञ आहोत व आपल्या स्वभावात कोणतेच दोष नाहीत अस गृहित धरुन बोलत असतो.
माझ जर लोकांशी पटत नसेल, वरचे वर माझ जर लोकांशी भांडण होत असेल तर नक्कीच माझ्या स्वभावात महादोष आहे अस म्हणायला काहीच हरकत नाही.
शेवटी कोणी कोणत्या गोष्टीचा अभिमान बाळगायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण सर्व सुजाण वाचक आहात.
आपल्या आयुष्यातल्या एखाद्या घटनेकडे समाज कशा नजरेनी बघतो ते तर आपल्याला समजेल न !
आपल्याला आपल्या स्वभाव दोषांचा नक्किच गर्व नाही. तेव्हा चला आपणच आपल्या स्वभावाच मुल्यमापन करुया.
....निरंजन
No comments:
Post a Comment