एक हंसाची जोडी आकाशातुन संथपणे उडत होती. एकमेकांशी गप्पा मारत उडताना व एकमेकांशी खेळताना ते खुप लांब आले. जेव्हा सुर्यास्त व्हायला आला तेव्हा त्यांच्या लक्षात आल की ते आपल्या गावापासून खुपच लांब आलेले आहेत. एका वाळवंटात आलेले आहेत. इथे तर पाणी नव्हत, झाड नव्हती. दोघेही घाबरले. हंसिणी रडायला लागली. तीला तहान लागली होती. तेव्हढ्यात हंसाला दुरवर एक झाड दिसल. वाळवंटात एकटच उभ असलेल. हंसानी हंसिणीला धीर दिला. म्हणाला त्या झाडावर आपण आजची रात्र काढू व पहाटेच परत ऋषिकेषला जाऊ.
ते दोघेही त्या झाडावर जाऊन एका फ़ांदीवर एकमेकांना चिकटुन बसले. त्याच झाडावर एक घुबड बसल होत. जसा अंधार वाढायला लागला तस ते घुबड जाग झाल आणि मोठ्या मोठ्यानी ओरडायला लागल. हंसिणी हंसाला म्हणाली की "कसा हा प्रदेश आहे आणि कसे पक्षी, रात्री नीट झॊपुही देत नाहीत" हंस म्हणाला "आता मला समजल, हा प्रदेश इतका वैराण का. ज्या प्रदेशात उल्लु (घुबड) राहतात व रात्री ओरडतात तो प्रदेश वैराण होईल नाही तर काय होईल ?" दोघेही हासले "आजची रात्र कस तरी सहन कर आपण सकाळी परत जाऊ."
झाडावर बसलेल्या घुबडानी ते ऎकल, तो परत मोठ्या मोठ्यानी ओरडायला लागला.
सकाळ झाली. हंस व हंसिण जागे झाले. ते निघणार तेव्हढ्यात घुबड त्यांच्याजवळ आल व म्हणाल
"माफ़ करा माझ्या ओरडण्यामुळे तुम्हाला रात्री त्रास झाला"
"काहीच हारकत नाही मित्रा. धन्यवाद"
इतक बोलुन हंस व हंसिण दोघेही जाण्यासाठी निघाले. घुबड मोठ्यानी ओरडुन म्हणाला,
"हंसा तू जातोयस तर जा, पण या माझ्या बायकोला कशाला नेतोयस? "
हंस चिडला "ही माझी बायको आहे. ही माझ्याच बरोबर आलेली हे व माझ्याच बरोबर जाणार आहे"
घुबड भांडायला लागल. खुप आरडा ओरडा झाला. आजुबाजुचे सगळे पक्षी, प्राणी व माणस जमा झाले. केस पंचायती समोर मांडल्या गेली.
पंचांनी दोघांची बाजु ऎकुन घेतली. पंच एका बाजुला केसबाबत चर्चा करायला गेले.
पंच १ : खरी तर ही हंसिण हंसाची बायको आहे. या केसमधे काहीच दम नाही.
पंच २ : तुमच म्हणण बरोबर आहे. पण हा हंस बाहेरुन आलेला आहे व निघुन जाणार आहे. घुबडतर इथेच राहणार आहे.
पंच ३ : आपल्या इलेक्शनला या घुबडांचाच आपल्याला उपयोग होतो. निर्णय आपल्याला यांच्याच बाजुनी द्यावा लागणार आहे.
मुख्य पंच : बरोबर आहे तुमच. आपण घुबडाच्या बाजुनीच निर्णय देऊ. मंत्र्यांचाही मला तसाच फ़ोन आलेला होता.
निर्णय देताना मुख्य पंचांनी खुप मोठ भाषण केल.
"या केसमधे आम्ही दोन्ही बाजु नीट ऎकुन घेतलेल्या आहेत. साक्षी पुरावे तपासले आहेत. आणि आम्ही या निर्णयाप्रत पोहोचलो आहोत की हंसिण ही घुबडाचीच बायको आहे. हंस त्याच्यावर अन्याय करतोय. हंसिणीला घुबडाच्या ताब्यात देऊन हंसानी ताबडतोब हा भाग सोडुन निघुन जाव.
पुढे ते म्हणाले की
"घुबडांवर या देशात किती अन्याय होतोय, या देशाची साधन संपत्ती खरी तर या घुबडांचीच आहे. या पुढे आपण ते चालु देणार नाही. घुबडावर केलेल्या अन्यायाबद्दल ही पंचायत हंसाचा तीव्र निषेध करते."
निर्णय ऎकुन हंस व हंसिण रडायला लागले. जमिनीवर लोळायला लागले. चोचीनी आपली पिस उपटायला लागले. पंचायतीनी दिलेल्या निर्णया बर हुकुम हंस जायला लागला. खाली मान घालुन तो रडत चालला होता. घुबडानी त्याला हाक मारली जवळ आला व म्हणाला
"मित्रा तुझी बायको तर घेऊन जा"
"हंस म्हणाला तुमच्या पंचायती समोर झालेला निवाडा तर तू ऎकलेलाच आहेस"
"हंसा, मित्रा हंसिण तुझीच बायको आहे. होती, आहे व पुढेही राहिल. तू म्हणालास न की ज्या भागात उल्लु राहतात तो भाग वैराणच होणार. तर ऎक हा भाग घुबडांमुळे वैराण झालेला नाही तर मुर्खासारखे निर्णय देणार्या या पंचायतीमुळे, कोर्टामुळे हा भाग वैराण झालाय.
ज्या देशात न्यायव्यवस्थाच अशी उल्लुंच्या हातात जाते त्या देशाच भवितव्य काय वेगळ असणार ?
ज्या देशात होणारा प्रत्येक निर्णय हा जर अशा उल्लुंच्या हातात जात असेल तर त्यासाठी त्या देशात राहणारी जनताही तेव्हढीच जबाबदार आहे. "
घुबडाचे आभार मानुन परत हंस व हंसिण समाधानानी आकाशात उडुन गेले.
No comments:
Post a Comment