वासंती
भराभर काम उरकत होती.
लहान
अनुप झोपला होता तोवर काही
कामं उरकण आवश्यक होत.
आज
अमोलबरोबर शॉपिंगला जायच
होत.
पुढच्या
महिन्यात चार पाच नात्यातली
लग्न होती.
हा
टॉमी पण सारखा पाया पायात येत
होता.
वासंतीनी
टॉमीला जवळ घेतल त्याची पापी
घेतली.
“टॉमी
बाळा,
आय
लव्ह यु !
सारखा
पाया पायात येऊ नकोस"
टॉमीवर
ती मुलासारख प्रेम करत होती.
तीनी
अनुप झोपलेला होता त्याच्या
कॉटच्या जळच टॉमीला बांधुन
ठेवल व म्हणाली
"टॉमी,
अनुपकडे
लक्ष ठेव बर का !
तुझा
लहान भाऊ आहे न तो.
त्याची
दुधाची वेळ झाली की तो उठेल.
तो
पर्यंत भुकुन भुकुन त्याला
उठवु नकोस"
टॉमीला
लगेच समजल.
खुप
समजुतदार कुत्रा होता तो.
त्यानी
आपली गळयातली साखळी पायानी
नीट केली व थोडा वेळ मान पायानी
खाजवुन तो मागच्या पायावर
बसुन व जिभ बाहेर काढुन आपल्या
लहान भावाकडे बघत बसला.
अनुप
जागा झाला की त्याच्याशी
खेळणार होता तो.
वासंतीनी
काम उरकल.
कपडे
बदलले.
गरम
केलेल दूध तोवर थोड थंड झालेल
होत.
तीनी
ते बाटलीत भरल व बेडरुममधे
आली.
त्या
मोठ्या बेडरुमच्या एका बाजुला
बेड होता.
तीला
अनुप दिसला.
तो
नुकताच जागा झाला व उपडा झाला.
नुकताच
अनुप उपडा होऊन सरपटायला
लागलेला होता.
वासंती
म्हणाली
“अनु,
थांब
पडशील"
ती
झटपट बेडजवळ येत होती.
तेव्हढ्यात
आईकडे बघत अनुप सरपटत पुढे
आला व बेडवुन पडला.
वासंती
“अग
बाई"
अस
किंचाळुन पुढे झाली पण काही
वेगळाच प्रकार झाला होता.
पडणारा
अनुप अदृष्यझाला
होता.
“अनु
....”
अस
मोठ्यानी किंचाळुन वासंती
त्याला शोधायला लागली.
पण अदृष्य झालेला
अनुप तीला दिसत नव्हता.
त्याचा
आवाज मात्र एेकायला येत होता.
वासंती
रडायला लागली.
तीच
रडण एेकुन शेजारीण धावली.
एकुण
प्रकार पाहिल्यावर त्या
शेजारणीनी सगळी सुत्र आपल्या
हातात घेतली.
वासंतीच्या
नवऱ्याला अमोलला फोन करुन
ताबडतोब घरी बोलावल.
जवळच्या
पोलिस स्टेशनला फोन करुन
त्यांना वर्दी दिली आणि अनुपला
शोधायचा आपल्या परीनी प्रयत्न
सुरु केला.
वासंती
घायमोकलुन रडत होती.
टॉमी
सारखा भुकत होता.
साखळीला
हिसके देत होता.
एक
तगडा पोलिस इंस्पेक्टर,
एक
हाडकुळा पण तरतरीत हवालदार
थोड्याच वेळात पोचले.
त्यांच्या
पाठोपाठ धावत धावत अमोल येऊन
पोचला.
अमोलला
पाहिल्यावर वासंतीनी त्याला
मिठी मारली व रडतरडत काय झाल
ते सांगितल.
इंस्पेक्टरनी
कॉंस्टेबलला खुण केली व त्यानी
सर्व घरभर फेरी मारुन काही
अनुचित दिसत नाही हे पाहिल.
आता
अनुपच्या भुकेची वेळ झालेली
होती.
तो
मोठ्यानी रडायला लागला.
सर्वांना
लहान मुलाच्या रडण्याचा आवाज
तर एेकायला येत होता पण अनुप
दिसत नव्हता.
अनुपच
रडण एेकुन वासंती व अमोल दोघेही
रडायला लागले.
शेजारीणीलाही
अनुपचा खुप लळा होता.
ती
पण रडत होती.
पोलिसांना
काहीच समजत नव्हत करायच काय.
पंचनामा
तरी काय करणार ?
काय
झाल याची माहिती पण कोणी नीट
देत नव्हत.
तरी
थोड थोड विचारुन पंचनामा तयार
केला.
नुसत
बघत बसण्याशिवाय हातात काहीच
नव्हत.
हवालदार
वैतागला होता.
मुलाच्या
रडण्याचा आवाज,
बाई
घायमोकलुन रडते,
तीचा
नवरा रडतोय.
हे
कमी होत म्हणुन हे कुतरडं
मोठ्या मोठ्यानी भुकतोय.
आज
सकाळीच त्याला साहेबांनी
कारण नसताना जाम शिव्या दिलेल्या
होत्या.
आता
डबा उघडुन जेवणार तर ही केस
आली.
जाम
वैतागला होता बिचारा.
त्यानी
विचार केला निदान या कुत्र्याची
साखळी सोडु.
तो
बाहेर जाईल.
एक
आवाज बंद होईल.
त्यानी
कुत्र्याला सोडल व कुत्र्यानी
एकदम झेप घेतली.
हवालदारानी
जाऊन टॉमीची साखळी सोडली व
टॉमीनी धावत जाऊन झेप घेतली.
ज्या
ठिकाणाहुन अनुप गायब झाला
होता तीथुनच टॉमी पण गायब
व्हायला लागला.
वासंतीनी
ते पाहिल.
एक
मुल तर गायब झालच आहे.
आता
हे दुसर बाळ गायब होतय.
तीनी
"टॉमी...”
असा
टाहो फोडुन झेप घेतली व टॉमीची
तंगडी पकडली.
टॉमी
पुर्ण गायब झाला व वासंती पण
कंबरेपर्यंत अदृष्य झाली.
अमोलनी
“वसु...”
अस
ओरडुन तीची तंगडी पकडली.
वासंती
गायब झाली व अमोल पण गायब होत
होता.
हवालदारानी
पटकन अमोलची तंगडी पकडली.
अमोल
गेला व हवालदार पण गायब व्हायला
लागला.
इंस्पेक्टर
उठला.
म्हणाला.
“त्यांना
मरु दे.
तू
कशाला जातोस"
अस
म्हणुन त्यानी हवालदाराची
तंगडी पकडली व त्याला जोरात
ओढल.
हवालदार
बाहेर आला.
त्याच्या
हातात अमोलची तंगडी.
अमोल
बाहेर आला.
त्याच्या
हातात वासंतीची तंगडी.
वासंती
बाहेर आली.
तीच्या
हातात टॉमीची तंगडी व टॉमी
बाहेर आला त्याच्या तोंडात
अनुचा पाय.
अनुप
बाहेर आला व रडायला लागला.
------------------------------
मित्रांनो ही आहे आईनस्टाईननी मांडलेली रीलेटिव्हीटी (सापेक्षता) ची थिअरी. आपण त्रिमिती जगाचा विचार करतो. प्रत्येक पदार्थाला लांबी, रुंदी व उंची आहे. या झाल्या तीन मिती. पण यालाच जर आपण काळ ही एक मिती जोडली तर होईल चतुर्मीती जग. आपण अशा जगात राहतो. काळाबरोबर आपण पुढे पुढे जात असतो. गेलेला मागचा क्षण आपण पाहु शकत नाही. पण तो गेलेला क्षण तर असतोच न. फक्त आपल्याला तो दिसत नाही इतकच. एकाच वेळी दोन अश्या सृष्टी एकाच ठिकाणी अस्थित्वात असु शकतात. कधी कधी अपघातानी एखाद्या ठिकाणी या दोन सृष्टी एकत्र येतात. आपल्याला दूसऱ्या सृष्टीतल काहीच दिसत नाही. ज्या ठिकाणी या दोन सृष्टी एकत्र येतात अशा ठिकाणी आपल्याला त्या सृष्टीतली माणसं दिसु शकतात. यालाच कदाचित भुत म्हणत असतील. अशा ठिकाणाहुन आपला अनुप दूसऱ्या जगात निघुन गेला होता. कुत्र्याला सहाव इंद्रिय आहे म्हणुन अथवा तो ज्या ठिकाणी बांधलेला होता तिथे दोन्ही सृष्टी दिसत असतील. त्याला त्या सृष्टीत गेलेला व तीथे सरपटत आपल्यापासुन लांब जाणारा अनुप दिसत होता. बाकी कथा तर आपल्याला माहितीच आहे.
मी
माझ्याकडुन या कथेच स्पष्टीकरण
दिल.
ते
तुम्हाला कदाचित पटल नसेल.
रिलेटिव्हीटी
हा खुप मोठा विषय आहे.
ती
चतुर्मिती जगत इतकच देऊन
थांबता येत नाही.
तुम्हाला
या कथेबाबत काही मत मांडायच
असेल.
समजलेल्या
वा आधीच माहिती असलेल्या
रिलेटिव्हिटी थिअरी बाबत
काही मत मांडाव व थोडी तरी
चर्च्या करावी ही आपेक्षा
आहे.
No comments:
Post a Comment