मागे एका क्रिश्चन फ़दर्स बरोबर याबाबत बरीच चर्चा सुरु होती. अर्थात नक्की उत्तर मिळालच नाही. मनापासून पटेल अस कोणातच उत्तर यातुन मिळाल नाही.
शेजारचा मुलगा इंजिनिअरिंगला फ़ेल झाला...नाच्यो...आनंद झाला. बर झाल आमची मुलगी १० वीला नापास झाली, तेव्हा कसा मेलीला आनंद झाला होता ? आता स्वतःचा मुलगा नापास झाला तर कस वाटतय ?
करमरकरांची नेहा पळुन गेली आणि तीच्या मित्राशी लग्न केल....मनापासून आनंद.....
मला मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट आठवते. मुल्ला नसरुद्दीन धावत धावत येऊन आपल्या वडलांना सांगतो की "आपल्या बाजारपेठेत असलेल्या घराला आग लागली आहे. चला लवकर काही तरी करायला हव" त्याचे वडील आनंदानी नाचायला लागले. मुल्ला नसरुद्दीनला वाटल, वडलांना वेड लागल आहे. त्यानी वडलांना शांत व्हायला सांगितल आणि आनंदाच कारण विचारल. त्यांनी सांगितल की "अरे ते घर मी गेल्या आठवड्यात विकुन टाकल आहे"
हा झाला विकृत आनंद.
शेजार्याची पगार वाढ मिळाली, मुलगा चांगल्या मार्कानी पास झाला. मित्रानी नवी कार घेतली. शेजार्याच्या मुलीला मुलगा झाला. वा मस्त बातमी आहे. आनंद झाला.
हा सात्विक आनंद.
एका माणसाला लॉटरी लागली, त्यानी मोठ घर घेतल, बिझिनेस डेव्हलप केला. खुप आनंद झाला पण थोड्याच दिवसात त्याला धंद्यात खोट आली. अपार दुःखाच्या खाईत तो बुडाला. हा झाला क्षणिक आनंद.
कधी कधी आपल्याला वाटत की एखादा माणूस खुप आनंदात असेल. त्याचा सुंदर संसार असतो. व्यावहारीक दृष्ट्या तो आनंदात दिसतो. पण तो सतत चिडत असतो कारण तो मनात आनंदात नसतो.
त्याच वेळी व्यावहारीक दृष्ट्या एखादा माणूस दुःखात असेल अस वाटत पण तो मनानी शांत असतो. कदाचित तो आनंदी असेल. मला नाही सांगता येणार.
मला हाच प्रश्न आहे की नेमक आनंदी माणूस कोण ?
जॉन हे ची The Enchanted Shirt ही प्रसिद्ध कविता तर सर्वांना माहितीच आहे.
आनंदाबद्दल मला नुकतीच एक सुंदर व्याख्या मिळाली बघा...
Happiness is what you feel when you're NOT feeling.... self doubt, depressed, hateful, fearful, worried, unsatisfied, bored, grief, shame, guilt, discontent, anxious, annoyed, angry, irritated, stressed, frustrated, upset, down, sad, envious or jealous Whew! That’s a long list!
इंग्रजीत दोन शब्द आहेत Pleasure व Happiness. दिसायला दोन्ही खुप जवळचे वाट्तात. पण या दोन शब्दात बराच फ़रक आहे. Pleasure याचा अर्थ बाह्य गोष्टींपासून मिळाणारा आनंद. यात लॉटरी लागण, गाडी घेण या पासून ते सर्व छोट्यामोठ्या पण बाह्य गोष्टींचा समावेश असतो. तर Happiness याचा अर्थ मानसिक समाधान व त्यापासून मिळालेला आनंद असा काहीसा अर्थ घेता येईल. Pleasure साठी बाह्य घटनांची वा वस्तुची गरज आहे तर, Happiness साठी स्वतःवरच्या विश्वासाची गरज आहे.
मला महात्मा गांधींनी आनंदाची केलेली व्याख्या आठवते
Happiness is when what you think, what you say, and what you do are in harmony.
मला मुल्ला नसरुद्दीनची एक गोष्ट आठवली
नसरुद्दीनला दोन मुलं होती. एक सतत दुःखात राहायचा, त्याला काहीही दिल तरी तो दुर्मुखलेलाच असायचा. तर दूसरा सतत आनंदात असायचा, नाचत गात असायचा. मुल्ला नसरुद्दीनला दोघांचीही काळजी वाटायची. पहिल्या मुलाला आयुष्यात आनंद आहे हे समजाव अस त्याला वाटायच तर दूसर्या मुलाला आयुष्याची दुःखी बाजू समजावी व कधी त्रास झाला तर त्यानी खचुन जाऊ नाही अस वाटायच. एकदा त्यानी त्या दोन्ही मुलांना वेगळ्या वेगळ्या खोल्यांमधे कोंडुन ठेवल. जो सतत सुतकी चेहर्यानी बसायचा त्याला सुंदर सजवलेली खोली दिली. त्या खोलीत खुप सुखसोई होत्या. खुप पकवान्न व उंची मद्याची सोय होती. तर जो मुलगा सतत आनंदात नाचत असायचा त्याच्या खोलीत कोणत्याच सोई नव्हत्या. सुक गवत त्या खोलीत पडलेल होत व जाड्या दोन रोट्या व साधारण भाजी असलेल जेवण होत. दोन्ही खोल्यांमधे एक एक आतसा होता.
खुप वेळानी मुल्लानी पहिल्या खोलीच दार उघडल. त्याचा उदास राहणारा मुलगा जास्तच उदास दिसत होता. तो खुप रडत होता. मुल्लानी त्याला विचारल की "कारे बाबा तू का दुःखी ? " तो म्हणाला "मी विचार करत होतो की आज तर मला चांगल खाण आहे राहण्यासाठी चांगली खोली आहे. पण यातुन बाहेर आलो की परत रोजचच आयुष्य जगायचय. म्हणुन मी या सुखाकडे पाहुन रडत होतो"
मुल्लानी दूसर्या मुलाच दार उघडल. तो दिलेल जेवण संपवून सुक्या गवतावर आडवा पडुन एक छान गाण गात आनंदानी हासत होता. मुल्लानी त्याला विचारल "का रे बाबा तू का आनंदानी हासतोयस ? " तो म्हणाला "मी सुक्या रोट्या खाल्या त्या खाताना मला खुप वेड वाकड तोंड कराव लागत होत. समोरच्या आरशात ते मला दिसत होत. त्याकडे बघुन मी हासत होतो. नंतर मी गवतावर झोपलो. आणि विचार करत होतो, इथुन बाहेर पडलो की बाहेर किती मोकळा वारा असेल ? पक्षी गात असतील. ते आठवुन मी हासत होतो.
मुल्ला म्हणाला "सुख हे मानण्यावर आहे. आणि हे मानण आपल्या आतल्या वृत्तीवर आहे. आनंद आपल्या मनामधे आहे. तो ज्याला समजला त्याला निसर्गाच्या प्रत्येक कृतीत आनंदच आहे. प्रत्येक कृती प्रत्येक क्षण त्याला आनंदच देणार आहे"
बोअर केल न खुप. अस बोअर करायला मला खुप आवडत. त्यातही एक आनंदच मिळतो. हा हा हा !
आपण आनंदाची व्याख्या करु शकाल का ? आपण कशाला आनंद म्हणतो ?

No comments:
Post a Comment